माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने उचलण्यात आला मातीचा ढिगारा...
माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने उचलण्यात आला मातीचा ढिगारा...

पनवेल / दि.०२ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने नवीन पनवेल सेक्टर ३ मधील मातीचा ढिगारा उचलण्यात आला. तत्परतेने हि समस्या सोडवल्याबद्ल नागरिकांनी समाधान व्यक्त करत विक्रांत पाटील यांचे आभार मानले. 
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग १८ मधील नवीन पनवेल सेक्टर ३ मध्ये स्टील मॅन सोसायटी समोरील असलेल्या उद्यानालगत अनेक दिवस मातीचा ढिगारा पडला होता व याला कचराकुंडीचे स्वरूप येत चालेले होते. याबाबतची तक्रार नागरिकांनी माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे केली. कर्तव्यदक्ष मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांना त्रासदायक ठरत असलेल्या मातीचा ढिगारा उचलण्यास सांगण्यात आले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सकारत्मक प्रतिसाद देत मातीचा ढिगारा उचलून घेतला. विक्रांत पाटील तत्परतेने हि समस्या सोडवल्याबद्ल नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले. 


फोटो : माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने उचलण्यात आला मातीचा ढिगारा
Comments