पंचरत्न इंग्रजी माध्यम शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन...
पंचरत्न इंग्रजी माध्यम शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन...


पनवेल / प्रतिनिधी - : पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या  माध्यमातून शुश्रूषा सुपरस्पेशालिटी रुग्णालय-पनवेलडॉ.डी. जी पोळ फाउंडेशन व वाय.एम.टी आयुर्वेद रुग्णालय-खारघर यांच्या वतीने उरण तालुक्यातील पिरकोन येथे पंचरत्न इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

          यावेळी त्यांचे सहकारी रोहन अरविंद गावंड व त्यांच्या पत्नी रसिका रोहन गावंड या दाम्पत्यांनी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिरकोन येथील डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील गरीबगरजू असे एकूण १०४ विद्यार्थ्यांची वार्षिक फी एकूण ४२ हजार २४० एवढी फी भरली. कला,   क्रीडाआरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रीतम म्हात्रे यांचे सहकारी देखील समाजसेवा करत असल्याचे पाहून   त्याना अभिमान वाटला.

    यावेळी कार्यक्रमास कलावती गावंड (मा.जी. प सदस्या)अनंता हरिश्चंद्र गावंड (चेअरमन पंचारत्न इंग्रजी माध्यम)स्वामीनाथ गावंडनिखिल गावंड (सदस्य)कमलाकर गावंड। (सदस्य)अंकित पाटील(सदस्य)रसिका ठाकूर (सदस्य)प्रियांका पाटील (सदस्या)दशांकी गावंडरसिका गावंडजगदीश गावंड ,    मनिराम गावंडअनंत हरी गावंड,धनंजय पाटीलप्रदीप पाटीलबारदाना जोशी, भाई पाटीलरोहन गावंड , जगदीश पाटील, नम्रता गावंड (सदस्य) यु. व्ही. जगताप (मुख्याध्यापक,क.भा.पाटील विद्यालय)सर्व शिक्षक, रूपाली म्हात्रे(मुख्याध्यापिका,पंचरत्न इंग्रजी माध्यम),विलास पाटील, सुधीर गावंडसुरेंद्र गावंड, संतोष मोकल(पोलिस पाटील) ,   तसेच शेकाप, शिवसेनेचे पदाधिकारी,   कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळेचे सर्व विद्यार्थीआरोग्य तपासणीसाठी आलेले सर्व नागरिक उपस्थित होते.

Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image