बिल्डीगचे पेन्टीगचे काम करताना खाली पडुन कामगाराचा मृत्यू ...
बिल्डीगचे पेन्टीगचे काम करताना खाली पडुन कामगाराचा मृत्यू ...


पनवेल / दि.20 (संजय कदम) : उलवे येथे बिल्डीगचे तिस-या मजल्यावर पेन्टीगचे काम करीत असताना खाली पडुन गंभीर जखमी होऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बिल्डर व लेबर कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
रिझवान आलम मो. फजलुन रेहमान हा उलवे येथील श्रीहाईट प्लॉट नं. ४२२, सेक्टर २५ ए येथे बिल्डीगचे तिस-या मजल्यावर पेन्टीगचे काम करीत असताना त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने तो गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. रिझवानच्या सुरक्षेकरीता लागणारे साधण व उपकरणे बिल्डर दिलीप गोपिचंद मिश्रा व लेबर कॉन्ट्रक्टर मोहम्मद बबलु आलम यांनी न पुरवल्यामुळे त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments