पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व रा. स्व संघ जनकल्याण समिती डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाचा उपक्रम ....
पनवेल/(प्रतिनिधी) पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व रा. स्व संघ जनकल्याण समिती डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीरात पनवेल, नवी मुंबई मधील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले. त्यांचे स्मरण म्हणून महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने पनवेल येथील डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात हे शिबीर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन सल्लागार ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांच्या हस्ते, शिबिरासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ईसीजी कक्षाचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, बीएमडी कक्षाचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, तर लॅब कक्षाचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी व ज्येष्ठ पत्रकार दीपक महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये सीबीसी, ईसीजी, इ एन टी, बी.पी., एच.बी.ए. १ सी या चाचण्या करण्यात मोफत करण्यात आल्या.
या कार्यक्रमास पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, कार्याध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस संतोष सुतार, सहसचिव अनिल कुरघोडे, उपाध्यक्ष आनंद पवार, रवींद्र गायकवाड, खजिनदार हरेश साठे, अकबर सय्यद, अनिल भोळे, सुनील कटेकर, मयूर तांबडे, संतोष भगत, विशाल सावंत, गणपत वारगडा, किरण बाथम, शेखर भोपी, तुळशीराम बोरीले, राजेंद्र कांबळे, गौरव जहागीरदार, अनिल राय, नाना चौधरी, शैलेश चव्हाण, विकास पाटील, सुनील वारगडा, संतोष आमले, राजू गाडे, प्रगती दांडेकर, प्रतीक वेदपाठक, आदी पत्रकारांसह रा. स्व संघ जनकल्याण समितीचे प्रकल्प सचिव राजीव समेळ, व्यवस्थापक सुनील लगाटे, समाजसेवक रवींद्र पाटील उपस्थित होते.