उरण नाका रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ स्वर्गीय दि बा पाटील यांना वाहण्यात आली श्रद्धांजली...
स्व.दि बा पाटील यांना वाहण्यात आली श्रद्धांजली...
पनवेल दि.१३(वार्ताहर): भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ व दिवंगत दि बा पाटील यांची ९७ वी जयंती प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटना उरण नाका पनवेल यांच्यावतीने साजरी झाली. यावेळी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
           महेश साळुंखे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळविण्यासाठी वेचले.  त्यांनी सिडको आणि शासनाच्या विरुद्ध प्रकल्पग्रस्तांचे अनेक लढे उभारले त्यामुळेच सिडकोला प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेचे भूखंड देण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे  त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेवर व्यतीत केले आज त्यांच्यामुळे भूमिपुत्र सुखी समाधानाने जगत आहेत याचे श्रेय पाटील साहेबांनाच जात आहे. नव्याने होत असलेल्या विमानतळाला दि. बा पाटील साहेब यांचे नाव देण्यात येणार आहे त्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे मी आभार मानत आहे.


फोटो: दिवंगत दि. बा. पाटील
Comments