रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये वाहतुकीच्या नियमांसंदर्भात मार्गदर्शन शिबीर...
वाहतुकीच्या नियमांसंदर्भात मार्गदर्शन शिबीर...

पनवेल दि. १६ (वार्ताहर) : पनवेल इंडस्ट्रीज टू व्हिलर डिलर यांचे तर्फे रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त वाहतुकीच्या नियमांसंदर्भात मार्गदर्शन शिबिराचे पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेट च्या मिटिंग हॉल मध्ये आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पनवेल डेप्युटी आर टी ओ सचिन विधाते, श्री. ठोंबरे, पनवेल शहर वाहतूक प्रमुख संजय नाळे, पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष विजय तोखंडे, मे एचएम मोटर्स चे मालक मनोज सूचक व सुनील सूचक यांच्यासह मान्यवर तसेच पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेटमधील टु व्हिलर व फोर व्हीलर मधील सुपरवायझर, मेकॅनिक, ओनर व अन्य मान्यवर उपस्थितीत होते. 
या कार्यक्रमाचे संचालन मे एच एम मोटर्स चे सीईओ हर्षल सूचक यांनी केले. यावेळी रस्त्यावर गाडी चालवताना घ्यावयाची काळजी, वाहतुकीच्या नियमांचे पालन, अपघाताचे प्रमाण, हेल्मेटची आवश्यकता, सीट बेल्टची गरज याबद्दल मान्यवरांनी मार्गदर्शन केले.फोटो : रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये वाहतुकीच्या नियमांसंदर्भात मार्गदर्शन शिबीर
Comments