साई दरबार येथे प्रजासत्ताक दिन शेकडो विद्यार्थ्यांनाच्या उपस्थितीने संपन्न ....
साई दरबार येथे प्रजासत्ताक दिन शेकडो विद्यार्थ्यांनाच्या उपस्थितीने संपन्न 

पनवेल वैभव /  दि.२७ (संजय कदम) : शहरातील पनवेल रेल्वे स्थानक रोड येथील नवीन साई मंदिराच्या प्रांगणात सालाबादप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिन उत्साहात शेकडो विद्यार्थ्यांच्या साथीने साजरा संपन्न झाला. यावेळी श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी रामलाल चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करत राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.  

श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यंदाही भारताचा प्रजासत्ताक दिन पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त पनवेल रेल्वे स्थानक रोड येथील नवीन साई मंदिराच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांच्या वेशभूषा, नृत्यस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपली देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांच्या मनात देशभावनेची चेतना जागी केली. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतमाता कि जय, वंदे मातरम या देशभक्तीपर घोषणेने परिसर दुमदुमला होता. यावेळी श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी, सेक्रेटरी रामलाल चौधरी, उपाध्यक्ष राम थदानी, डॉ. सखू, रामलाल पाटील आदींसह पदाधिकारी, सदस्य व साईसेवक उपस्थित होते.





फोटो : साई दरबार येथे प्रजासत्ताक दिन शेकडो विद्यार्थ्यांनाच्या उपस्थितीने संपन्न
Comments
Popular posts
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image