मराठी पत्रकार परिषदेच्या कोकण विभागीय सचिव अनिल भोळे यांचा मंचच्या वतीने सत्कार..
अनिल भोळे यांचा मंचच्या वतीने सत्कार.. 

पनवेल/ (प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषदेच्या कोकण विभागीय सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल रसायनी टाइम्सचे संपादक अनिल भोळे यांचे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्यावतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. 
       यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्यावतीने अध्यक्ष माधव पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, विवेक पाटील, हरेश साठे, अनिल कुरघोडे, नितीन कोळी, राजू गाडे यांनी अनिल भोळे यांचा सत्कार करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 
अनिल भोळे यापुर्वी परिषदेशी संलग्न रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष होते. रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरची जबाबदारी अनिल भोळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
Comments