पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
शनिवार दिनांक 7 /1/2023 रोजी सकाळी अकरा वाजता पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विणा पूजन करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली . त्यांच्यासोबत पनवेलच्या माजी उपमहापौर सीता ताई पाटील याही उपस्थित होत्या . श्री संत भगवान बाबा व वामनभाऊ महाराज यांचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा शनिवार दिनांक 7 /1/2023 ते शनिवार दिनांक 14/1/ 2023 पर्यंत साजरा होणार आहे . खांदा कॉलनी येथील पोलीस स्टेशन समोरील मैदानामध्ये या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . दररोज सकाळी हरिपाठ दुपारी गीता पारायण तसेच संध्याकाळी सहा वाजता गणेश महाराज घुगे यांचा हरिपाठ असणार आहे .
शनिवार दिनांक 7/1/ 2023 रोजी ह.भ.प प्रज्ञाताई ठोंबरे आष्टी यांचे कीर्तन,
रविवार दिनांक 8/1/2023 रोजी ह.भ.प पांडुरंग महाराज डोंगरेश्वर संस्थान यांचे कीर्तन, सोमवार दिनांक 9/1/ 2023 रोजी ह.भ.प राधाताई सानप महाराज आईसाहेब संस्थान पाटोदा यांचे कीर्तन .
मंगळवार दिनांक 10/1/23 रोजी ह.भ. प महेश महाराज साळुंखे पाटणोली संस्थान यांचे कीर्तन, बुधवार दिनांक 11.1.2023 रोजी ह.भ.प प्रकाश महाराज साठे शास्त्री बिडकर यांचे कीर्तन,
गुरुवार दिनांक 12.1.2023 रोजी ह.भ. प नारायण महाराज केंद्रे शास्त्री आळंदीकर यांचे कीर्तन,
शुक्रवार दिनांक 13/1/23 रोजी ह भ प ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फड औरंगाबादकर यांचे कीर्तन, व शनिवार दिनांक 14/1/23 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्त परायण सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे किर्तन होईल . त्यानंतर महाप्रसाद होईल.तरी या सर्व कीर्तनाचा परिसरातील सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन या मंडळांनी केले आहे .
त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी कीर्तन संपल्यानंतर आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन मंडळाने केलेले आहे. श्री संत वामन भाऊ व भगवान बाबा महाराज पुण्यतिथी उत्सवाचे हे अठरावे वर्षे आहे . या सोहळ्याचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष हरिदास वनवे उपाध्यक्ष सुनील खाडे उपाध्यक्ष विनायक मुंडे सचिव देविदास खेडकर यांनी केले आहे . राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जे कार्य मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात केले त्यांचा प्रसार व प्रचार ही मुंबई व नवी मुंबई परिसरातील मंडळी करत असतात दरवर्षी मुंबईमध्ये कमीत कमी 20 ते 25 ठिकाणी या सप्ताहाचा आयोजन होत असतं . या सर्व कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा असे प्रसिद्धी प्रमुख बबन बारगजे यांनी म्हटले आहे .