पटवर्धन रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण याच्या हस्ते ध्वजारोहण...
पटवर्धन रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण याच्या हस्ते ध्वजारोहण...

पनवेल वैभव / दि.२७ (संजय कदम) : शहरातील पटवर्धन रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर सोमण यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतमाता पुजन झाल्यावर धन्वंतरी स्तवन करुन रुग्णालय कर्मचारी यांनी सावरकर लिखित जयोस्तुते श्रीमहन्मंगले हे सामुहिक गीत सादर केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र ईनामदार, उपाध्यक्षा डॉ. किर्ती समुद्र, कार्यवाह राजीव समेळ, कोषाध्यक्षा सौ.अनुराधा ओगले, सह कोषाध्यक्ष चेतन जोशी, रुग्णालय मुख्य संचालक व्यवस्थापक सुनील लघाटे, सदस्य महेश मुद्रस, डॉ. ययाती गांधी, सुदर्शन कौलगे, रा.स्व.संघ कोकण प्रांत सहकार्यवाह शरदचंद्र ओगले व रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : ध्वजारोहण करताना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण
Comments