पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा ...

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे विचार जपण्याचे कार्य म्हणजेच पत्रकारिता : प्रितम म्हात्रे

प्राचीन हेल्थकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.मंगेश डाके यांची पत्रकारांना अनोखी भेट..

वर्षानुवर्षे पत्रकारांच्या आरोग्यासाठी मोफत तपासणीचा घेतला निर्णय...


पनवेल/ (प्रतिनिधी): मराठी भाषेतील आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दि. 06 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे नियतकालिक सुरू केलं, मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम आणि त्यांची निष्ठा आजही असंख्य मराठी तरुणांसाठी प्रेरणास्थान राहिले आहे. गेली अनेक वर्षे आजचा दिवस हा (दि.06 जानेवारी) मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जात आहे. खरंतर 06 जानेवारी हा दर्पण वृत्तपत्राचा स्मरण म्हणून  देशभरातील सर्वच महत्वाच्या शहरांमध्ये  मराठी पत्रकार दिन साजरा होत असतो.  
      यावर्षी पनवेल तालुका पत्रकार महासंघ आणि प्राचीन हेल्थकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून  पनवेलमधील पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केला होता. यावेळी पनवेल तालुक्यातील असंख्य पत्रकार उपस्थित होते.
सदर शिबिराचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, यावेळी प्राचीन हेल्थकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. मंगेश डाके, डॉ.सौ.संगीता डाके, दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू, जेष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर, जेष्ठ पत्रकार रमेश भोळे, मदन बडगुजर, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाच्या  उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकारांसह नवतरुण पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेवून त्यांना आदरांजली वाहिली. 
सदर शिबिरात पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, यावेळी 34 पत्रकारांची रक्त तपासणी, 43 पत्रकारांची इसीजी  तर 44 पत्रकारांचे एक्स-रे काढून तज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या करण्यात आल्या. अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम झाल्याने उपस्थित मान्यवर तसेच जेष्ठ पत्रकारांसह नवोदित पत्रकारांनी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांचे कौतुक केले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सर्वच पत्रकार मित्रांचे कौतुक करावे तितके कमी आहे. कारण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे विचार जपण्याचे कार्य आजचे पत्रकार करीत आहेत आणि ते येथील पत्रकारांच्या माध्यमातून केले जाते, म्हणून पत्रकारिता जिवंत असल्याचे मत प्रितमभाई म्हात्रे यांनी व्यक्त करून पत्रकारांचे भरभरून कौतुक केले.
यावेळी प्राचीन हेल्थकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.मंगेश डाके यांनी पत्रकारांना अनोखी भेट देत वर्षानुवर्षे पत्रकारांच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय आपल्या मनोगतातून जाहीर केला.
यावेळी डॉ.पंकज भिरुड यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला हृदयविकाराचा काही त्रास जाणवला तर कशी काळजी घ्यावी आणि तात्पुरता उपचार कसा करावा, याचे डेमो स्वरूपात प्रात्यक्षिक दाखविल्याने पत्रकारांना एखाद्याची मदत करण्यासाठी जणू काही एक मिनी डॉक्टरच तयार केले असावे, असा विश्वास पत्रकारांच्या मनात निर्माण झाला. 
यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पनवेल तालुका पत्रकार महासंघाने आजवर केलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती मान्यवरांसह उपस्थित पत्रकार बांधवांना दिली, यावेळी पत्रकार महासंघातर्फे वृक्षारोपण, आधारगृहात अन्नधान्य वाटप, कुष्ठरोग वसाहतीत खाऊ वाटप, मोफत आरोग्य शिबीर, जागतिक महिला दिनी संघर्षवादी महिलांचा सन्मान, जागतिक कीर्तीच्या विजेत्यांचा सन्मान यासारख्या कार्यक्रमांची माहिती दिली, यावेळी उपस्थित मान्यवरांनी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे कौतुक केले.
यावेळी ज्येष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर, सुनिल पोतदार, दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, रमेश भोळे,  गणेश कोळी,  दीपक महाडिक, खजिनदार सुधीर पाटील, सचिव मयूर तांबडे,  प्रदिप वालेकर, सुभाष वाघपंजे,  अरुणकुमार मेहेत्रे, मदन बडगुजर, बाळकृष्ण कासार, विशाल सावंत, मिलिंद खारपाटील, सुनील कटेकर, राजू गाडे, उमेश भोईर, ज्योती सातारकर, सुष्मा केणी,  मौसमी तटकरे, सय्यद अकबर, राज भंडारी, केवल महाडिक,  संजय कदम, विजय पवार, गौरव जहांगिरदार , निलेश सोनावणे, रवींद्र गायकवाड,  भालचंद्र जुमलेदार, विक्रम बाबर, राजेश डांगळे, अनिल भोळे, कुणाल लोंढे,  वैभव गायकर,  किरण बाथम,  सनिप कलोते, शंकर वायदंडे, प्रदीप वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील, दिपाली पारसकर, अनिल कुरघोडे, शेखर भोपी,  गणपत वारगडा, सुनील वारगडा, चंद्रकांत शिर्के, गुड हेल्थ ग्रुपचे पी.बी.पाटील, खुटले गुरुजी, पांडुरंग चव्हाण, सर्जेराव पाटील, दत्तात्रेय पैलकर, अनिल रावराणे आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचीन हेल्थकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.मंगेश डाके, डॉ.संगीता डाके, डॉ.पंकज भिरुड, डॉ.सतीश भोईर, डॉ.निशिगंधा सोंडकर, डॉ.सोनाली पाटील यांच्यासह रामचंद्र शेलार, साहिल पाटील, सायली पाटील, तृप्ती काव्हा, पराग गायकर, मोकल, जस्विन जोस, मंजुषा पवार, प्रणाली पाटील, सियोना खराडे, शुभम नांदरेकर, निखिल पाशिलकर, तबसुंम मॅडम, खुर्शीद मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली, शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे जेष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर यांनी मानले..
Comments