कंपनीच्या स्टॉकयार्डमधून कारची चोरी ..
कंपनीच्या स्टॉकयार्डमधून कारची चोरी ...


पनवेल / दि.20 (संजय कदम) : तालुक्यातील पळस्पे येथील महिंद्रा कंपनीच्या वाहनतळ (स्टॉकयार्ड) मधील कंपाऊंड मधून अज्ञात इसमाने कारसह इतर ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पळस्पे येथील महिंद्रा कंपनीचे वाहनतळ (स्टॉकयार्ड) मधील महिंद्रा कंपनीच्या कंपाऊंडचा मागच्या साईटचा पत्रा तोडून अज्ञात इसमाने कंपाऊंड मध्ये प्रवेश करुन १५ लाख ३० हजार ७०६ रुपये किमतीची काळसर रंगाची महिंद्रा कंपनीची थार मॉडेलची मोटार कार व १४ हजार रुपये किमतीची स्टेपनी टायर त्याचप्रमाणे ६ हजार पाचशे रुपये किमतीचे बोलेरो पिकअप मोटार जीपची स्टेपनी टायर असे एकूण १५ लाख ७१ हजार २०६ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Comments