मोटारसायकलची चोरी....
मोटारसायकलची चोरी....


पनवेल / दि.०४ (संजय कदम) : पनवेल शहरातील फडके नाटयगृहच्या पाठीमागील रोडवर पार्क केलेली मोटारसायकल अज्ञात इसमाने चोरून नेल्याची या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. 
योगेश पांडुरंग जाधव यांनी त्यांच्या मालकीची काळया निळया रंगाची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटार सायकल क्र MH 46 AT 3186 ही आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृह च्या पाठीमागे रोडवर फडके रोड येथे पार्क केली होती. मात्र अज्ञात चोरट्याने हि मोटारसायकल चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
Comments