वाल्मिकी नगर येथील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे मागणी..
बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे मागणी.. 

पनवेल /  दि.०३ (वार्ताहर) : पनवेल शहरातील वाल्मिकी नगर वसाहत येथील ड्रेनेज लाईनची अत्यंत दुरावस्था झाली असून हि ड्रेनेज लाईन तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेचे पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
  सदर निवेदनात प्रसाद सोनावणे यांनी म्हटले आहे कि, पनवेल महानगरपालिका हद्दीतील वाल्मिकी नगर वसाहत येथील ड्रेनेज लाईनची अवस्था हि खूप गंभीर झालेली आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत वाल्मिकी नगर वसाहतीचे पुनर्वसन होणार आहे. परंतु असे असले तरीही सद्यस्थितीत वसाहतीतील सर्व नागरिकांना रोज दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी वसाहती मध्ये स्वच्छता करून दिली. परंतु हा विषय तात्पुरत्या साफसफाईने सुटणार नसून सदर ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हि ड्रेनेज लाईन तातडीने दुरुस्ती द्यावी अशी मागणी प्रसाद सोनावणे यांनी केली आहे.फोटो : प्रसाद सोनावणे
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image