शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पाठपुराव्याने कळंबोली परिसरातील विकास कामांना सुरुवात...
 विकास कामांना सुरुवात...

पनवेल / (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सातत्याने शासनाकडे केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्याला यश आले असून मंजूर झालेल्या या विकासकामांचे आज कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.  
रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी शासनाकडे कळंबोली परिसरात असलेल्या विकासकामांसाठी वारंवार पत्रव्यवहार केला होता. सातत्याने केलेल्या त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून यामधील चार विकासकामांना शासनाकडून मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी कळंबोली परिसरात आय लव्ह कळंबोली तसेच आय लव्ह रोडपाली या दोन सेल्फी पॉइंट्सचे कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कळंबोली शहर संघटक अरविंद कडव, अक्षय साळुंखे, शहर समन्वयक गिरीश धुमाळ, राजेश जळे, नंदू चौधरी, आभाजी जावीर, समीम अन्सारी, लोखंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे आभार मानले.
फोटो : विकासकामांचे भूमिपूजन करताना शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर व इतर पदाधिकारी
Comments