पनवेलमध्ये उपसरपंच निवडणुकीतही भाजपची बाजी....

१० पैकी ६ ठिकाणी झेंडा फडकविला...

पनवेल / प्रतिनिधी : - 
पनवेल तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 10 पैकी सहा ठिकाणी झेंडा फडकविला आहे. त्याचप्रमाणे सोमवारी (दि. 2) झालेल्या उपसरपंच निवडणुकीतही भाजपने बाजी मारली. पदभार स्वीकारलेल्या शिवकर, नेरे व चिंध्रण येथील सरपंच व नवनिर्वाचित उपसरपंच तसेच सदस्यांना भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिवकर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आनंद ढवळे, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रकाश घाडगे, तर चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी एकनाथ पाटील हे थेट नागरिकांमधून निवडून आले आहेत. या सर्व सरपंचांनी सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. उपसरपंचपदाच्या निवडणुकीतही भाजपने यश प्राप्त केले आहे. त्यानुसार शिवकर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मते, नेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचदी निलिमा निलेश पाटील, तर चिंध्रण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुजित नामदेव पाटील यांची निवड झाली आहे.

या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, माजी पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, काळुंद्रे विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे, भाजप नेते शिवाजी दुर्गे, माजी सरपंच राजश्री म्हसकर, वासुदेव गवते, युवा नेते रोशन पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ पाटील, नेरे ग्रामपंचायत सदस्य राम पाटील, दिनेश मानकामे, शैलेश जाधव, वंदना रोडपालकर, कल्पना वाघे, महादू पाटील, सुनील पाटील, दीपक पाटील, गोटीराम म्हात्रे, दता भगत, संतोष चोरघे, विद्याधर चोरघे, सखाराम कलोते, हरिश्चंद्र जाधव, श्रीकांत गवते, अच्युत गवते, सागर पाटील, भरत काकडे, पांडुरंग भगत, अमित गवते, सुजय पाटील, जगदिश म्हसकर, मिलिंद पाटील, संजय पाटील, भाई गवते, सतीश घाडगे, किशोर खारके, माजी उपसरपंच सुजित पाटील, गणपत कडू, एकनाथ मुंबईकर, तुषार दुर्गे, नरेश सोनावणे, हरिश्चंद्र पाटील, राजेंद्र पाटील, रामदास पाटील, यदुनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाडेकर, गुरूनाथ पाटील, पी. एम. पाटील, संतोष देशेकर, अरुण पाटील, रोहिदास पाटील, सुरेश मुंबईकर, अभिमन्यू पाटील, रूपेश मुंबईकर, उदय पाटील, लक्ष्मण कडू, प्रकाश पाटील, प्रवीण मानकामे, भालचंद्र गाडगे, मोतीराम टेंभे, नामदेव पाटील, विश्वास पाटील, रूपेश पाटील, राकेश कडू, भानूदास पाटील, विनायक मानकामे, तुषार पाटील, आकाश कडू, यशवंत कदम, किसन पाडेकर, के. एस. कडू, हिरामण पाटील, प्रकाश गडगे, हरिश्चंद्र गडगे, शंकर मुंबईकर, अमित कडू, माथा पाटील, चंद्रकांत ढवळे, भास्कर पाटील, मारुती पाटील, मनोहर ढवळे, आंबो ढवळे, गोटीराम ढवळे, तुकाराम टोपले, भरत पाटील, तुकाराम तुपे, गोपाळ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या वेळी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे आणि सदस्यांची ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
Comments