पनवेल येथे ६ जानेवारीला होणार राष्ट्रीय मजदुर काँग्रेसचे (इंटक) राज्यस्तरीय अधिवेशन....
पनवेल येथे ६ जानेवारीला होणार  
राष्ट्रीय मजदुर काँग्रेसचे (इंटक) राज्यस्तरीय अधिवेशन....

पनवेल वैभव वृत्तसेवा ः
पनवेल येथे शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय मजदुर काँग्रेसचे (इंटक) महाराष्ट्र शाखेचे राज्यस्तरीय अधिवेशन वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे होणार आहे. 
यावेळी बोलताना महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले, आज सर्व कामांचा ओघ अदानींकडे चाललेला आहे. कामगारांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. एमएसईबी, एस.टी. महामंडळ, याचप्रमाणे अनेक कामगार संघटनांचे प्रलंबित प्रश्‍न अशा अनेक विषयांवर चर्चासत्र राज्यस्तरीय अधिवेशनात होणार आहेत. त्याचप्रमाणे आमच्या कामगार संघटनांच्या कामासंदर्भात स्थानिक वृत्तपत्रे याची दखल घेतात, पण राष्ट्रीय स्तरावरील मिडीया प्रसिध्दीची दखल घेताना दिसत नाही. कारण त्यांचे मालकच सरकारमध्ये आहेत. अशा प्रकारची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
सदर राज्यस्तरीय अधिवेशनात आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस एन.आय.एफ.आर. एम राघवय्या, केरळा इंटकचे अध्यक्ष आर चंद्रशेखरन, बिहार इंटकचे अध्यक्ष चंद्रप्रकाश सिंग यांची उपस्थिती राज्यस्तरीय अधिवेशनात लाभणार असल्याचे इंटकचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी पनवेल येथील काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र इंटक तथा सर्व सलग्न संघटना यांनी केले आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image