अनुवांशिक विकारांवर योग्य उपचार करण्याचे अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे आवाहन...


नवी मुंबईत ‘अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूट’ ची स्थापना
पनवेल वैभव वृत्तसेवा :-  ११ जानेवारी २०२३:- नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज अनुवांशिक विकार असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी अपोलो जेनोमिक्स इंस्टीट्यूट्सची स्थापना केली आहे. जेनोमिक अनुवांशिक विकारांशी संबंधित आहे तसेच यामुळे दुर्मिळ आणि अनुवांशिक रोगांचे निदान आणि उपचार करण्यात मदत होते. यामुळे एखाद्या व्यक्तीला रोग होण्याच्या जोखमीबद्दल आणि विशिष्ट उपचारांना त्यांच्या प्रतिसादाबद्दल माहिती देखील प्रदान केली जाऊ शकते आणि म्हणून अचूक व वैयक्तिकृत औषधोपचार करता येतात. दुर्मिळ विकारांचे निदान करण्याव्यतिरिक्त, जेनोमिक औषधाचा उपयोग कर्करोगाच्या फार्माकोजेनॉमिक्समध्ये आणि संसर्गजन्य रोगांच्या प्रादुर्भावाचा मागोवा घेण्यासाठी देखील केला जात आहे. अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूटमुळे व्यक्तीला, जोडप्यांना आणि कुटुंबीयांना जनुकीय विकारांचे वैद्यकीय, मानसिक, कौटुंबिक आणि पुनरुत्पादक परिणाम समजून घेण्यास मदत होईल. अपोलो जेनोमिक्स इन्स्टिट्यूटमधून मोठ्या लोकसंख्येला अनुवांशिक विकार, असामान्य अनुवांशिक चाचण्या, उशीरा वाढणारी मुले, जन्मजात विसंगती याबाबत आणि अनुवांशिक अस्वस्थता असलेल्या कुटुंबातील सदस्यांना देखील लक्षणीयरित्या फायदा होईल. जेनोमिक केंद्रामुळे संबंधित मध्यस्थी, दीर्घकालीन उपचार आणि सेवा घेऊन जनुकीय परिस्थितीचे त्वरित मूल्यांकन करण्यात आणि ओळख पटण्यास देखील मदत होईल.

आनुवांशिक विकारांवरती योग्य वेळी उपचार करून घेण्याचे आवाहन बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अपोलो हॉस्पिटलच्या पत्रकार परिषदेमध्ये केले. दिल्लीवरून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे शर्मिला टागोर यांनी पत्रकारांशी आणि अपोलो हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टर यांच्या सोबत संवाद साधला! नवी मुंबईमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून मला सर्वांना भेटून संवाद साधण्याची इच्छा होती परंतु काही कारणास्तव मी अशी ऑनलाईन संवाद साधत आहे असे बोलून त्या बद्दल त्यांनी खेद व्यक्त केला! नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स च्या अपोलो जीनोमिक्स या इन्स्टिट्यूट चे आज उद्घाटन शर्मिला टागोर यांच्या हस्ते झाले.त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शर्मिला टागोर यांनी, ''हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या वैद्यकीय उपचारांची देखील माहिती देऊन तिने वेळीच घेतलेल्या उपचारांचा दाखला दिला! मला आशा आहे की अनुवांशिक समुपदेशनाची उपलब्धता आणि अनुवांशिक विकारांबद्दल जागरूकता वाढल्याने, आपल्याला महिला आणि मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम निर्माण करता येईल. भारतातील रूग्णांच्या फायद्यासाठी नवीनतम वैद्यकीय तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा सुरु केल्याबद्दल मी अपोलो हॉस्पिटल्सचे मनापासून अभिनंदन करते.”

कु.संगिता रेड्डी, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाल्या, “संशोधनात असे आढळून आले आहे की जवळ-जवळ प्रत्येक रोगाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मूळ हे अनुवांशिक असू शकते. अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूट निर्माण करण्याचा मान सर्वप्रथम आम्हाला जातो, यामुळे जेनोमिक औषध दैनंदिन वैद्यकीय सेवांसाठी उपलब्ध होईल आणि अनुवांशिक अस्वस्थता असलेल्या रुग्णांना आणि कुटुंबांना मदत मिळेल. जेनोमिक्स केंद्र रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी निदान आणि चाचणी, रोगमुक्तता, समुपदेशन आणि बहु-वैशिष्ट्ये असलेली सेवा यासह सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करेल.”

अपोलो हॉस्पिटल्सचे ग्रूप वैद्यकीय संचालक प्रा. (डॉ.) अनुपम सिबल म्हणाले, “जेनोमिक औषधांमुळे एखाद्या व्यक्तीच्या अनुवांशिक संरचनेचे मूल्यांकन करून रोगावरील उपचार आणि त्यावरील प्रतिबंध यावर लक्ष केंद्रित करता येते. अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूट समर्पित आणि अनुभवी सल्लागार तसेच प्रमाणित अनुवांशिक समुपदेशक यांच्या सहाय्याने रुग्णांसाठी अनुवांशिक औषधातील प्रगतीचे रुपांतर वास्तविक लाभांमध्ये करेल. जेनोमिक औषधे परिवर्तनाची भूमिका निभावू शकतात अशा वैद्यकीय परिस्थितींमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे - मुलांमध्ये वाढ होण्यास विलंब, एकापेक्षा जास्त गर्भपात, प्रगत मातृत्व वय (आईचे वाढलेले वय/ऍडव्हान्स मॅटर्नल एज), वंध्यत्व, कुटुंबातील अनुवांशिक रोगाचा इतिहास. अपोलो हॉस्पिटल्समधील जेनोमिक औषधोपचारात तज्ज्ञ असलेली टीम हे सुनिश्चित करेल की या आजारांचे निदान लवकरात लवकर होईल तसेच इतर जोखीम असलेल्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी केली जाईल.”
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image