राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत मा.नगरसेवक विश्वास म्हात्रे यांनी पटकाविला द्वितीय क्रमांक...
म्हात्रे यांनी पटकाविला द्वितीय क्रमांक...

पनवेल / अनिल कुरघोडे : -

भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त निर्माण प्रतिष्ठान मुंबई आयोजित राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धेत माजी नगरसेवक विश्वास पांडुरंग म्हात्रे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेत म्हात्रे यांनी ५१ वर्षावरील गटात वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू, स्वातंत्रवीर सावरकर यांची चित्रे रेखाटली त्यापैकी त्यांच्या माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या सर्वोत्कृष्ट चित्राला रौप्यपदक  मिळून म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले.

म्हात्रे यांच्या चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांना अनेक वेळा विविध स्पर्धांमध्ये सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या या चित्रकलेच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
Comments