रायगड जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर वैश्य समाज भवन बनेल - राहुल नार्वेकर...
रायगड जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर वैश्य समाज भवन बनेल - राहुल नार्वेकर...

पनवेल / वर्ताहर -  : रायगड जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर वैश्य समाज भवन बनेल आणि वैश्य बांधवांना हक्काची आणि स्वतःची वास्तू प्राप्त होईल असे राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आश्वासित केले. रायगड जिल्हा वैश्य समाज महिला संघटना तर्फे कर्जत तालुक्यात महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विजय निकते, उमेश कोंडलेकर, रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक भोपतराव, महिला अध्यक्ष श्यामल आंग्रे, उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर, दिलीप भोपतराव, विलास मनोरे, मनोज आंग्रे, बाळा दलाल, राजाभाऊ पातकर माजी अध्यक्ष, अमित चौधरी, विनोद गुजरे, सुधीर जगे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोबाईल वरून कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
      रायगड जिल्हा वैश्य समाजाने तेरा वर्षे पूर्ण केलेली आहेत. यापुढे महिलांच्या कार्यक्रमासोबत पुरुषांचे देखील कार्यक्रम आयोजित करा. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात वैश्य समाजाला एकत्रित करण्यासाठी असेच कार्यक्रम आपण घेत राहू आणि समाजाला ताकद देऊ. वैश्य समाज बांधवांसाठी जॉब फेअरचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांना बाजारपेठ निर्माण करून देण्यास सांगितले. रायगड साठी काही करायचं असेल तर आम्ही ती संधी सोडत नसल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. आपण ताकद दिली तर विधानसभेचा नाही तर लोकसभेचा देखील अध्यक्ष आपला होईल. समाजातील तरुण पिढीला समाजाची साथ मिळण्यासाठी उद्योग, व्यवसाय या क्षेत्राकडे समाज बांधवांना मदत करण्याची गरज असल्याचे सांगितले. 
         या कार्यक्रमात मुलींनी आणि महिलांनी विविध कौशल्य, कला दाखवत नृत्य सादर केले. यातून एक ते तीन क्रमांक काढून त्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी समाजासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या दिवंगत व्यक्तीच्या नावे त्यांच्या कुटुंबियांना गौरविण्यात आले. तसेच समाजातील नवनियुक्त सरपंच, सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. तर सौंदर्य स्पर्धेत विविध ठिकाणी पारितोषिके मिळवणाऱ्या हर्षला योगेश तांबोळी यांचा राहुल नार्वेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला पनवेल, कर्जत, खालापूर, खोपोली, उरण, माणगाव, इंदापूर, रोहा, पेण येथील वैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परीक्षक म्हणून आशिमिक आनंद कामठे आणि विजया शिंदे यांनी काम पाहिले.
Comments