करंजाडेत ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न...
रमेश नामदेव केणी माजी सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण...
पनवेल --  करंजाडे येथे विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. के. पी. ग्रुपच्या वतीने सेक्टर 2 येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे चिंचपाडा गावाचे प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक माजी सरपंच रमेश नामदेव केणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी ध्वजास वंदनकरून सलामी दिली. 

प्रारंभी भारतमाता प्रतिमेचे पूजन तसेच भारतीय संविधानचे पूजन उपस्थित जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास रमेश नामदेव केणी, लहू केणी, जगदीश केणी, नामदेव केणी, सुरेश भोपी, शशिकांत केणी, समीर केणी, संजय परदेशीं, विजय केणी, कान्हा केणी, ज्ञानदेव केणी, मोहन परदेशीं, भगवान केणी, निवृत्ती चिकणे, वसंत नाईक, एकनाथ केणी दीपक भोपी, रविकांत भोपी, प्रदीप मुंडकर,संदेश मुंडकर भास्कर केणी, शिक्षक संदीप काठे, विद्यार्थी व महिला बहुसंख्यने उपस्थित होत्या के.पी. ग्रुप यांच्यासह ग्रामस्थ, महिला व विधार्थी आदी उपस्थित होते.
Comments