हिंदुहृदसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर...
हिंदुहृदसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर...

पनवेल वैभव / दि. १६ (संजय कदम) : हिंदुहृदसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवार २३ जानेवारी २०२३ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन पनवेल शहर शाखेतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन पनवेल शहर शाखा आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने  हिंदुहृदसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल ज्येष्ठ नागरिक संघात सोमवार २३ जानेवारी रोजी सकाळी ०९.३० ते दुपारी ०२.०० दरम्यान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, रक्त शुगर तपासणी, हाडांची तपासणी, डोळे तपासणी, दातांची तपासणी, फ्री बॉडी फॅट ॲनालिसिस आदी तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात नाव नोंदवण्यासाठी ..
राजेश वायंगणकर (मो. 9029935909), अलका सानप (मो. 9870257552) 
जयंत पाखरे (मो. 9323640044) यांच्याशी संपर्क साधावा तसेच या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख आणि नवीन पनवेल महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांनी केले आहे.
Comments