उत्तरप्रदेश येथील खून करून फरार झालेल्या ४ आरोपींना गुन्हे शाखा कक्ष- २ पनवेलने केले गजाआड...
गुन्हे शाखा कक्ष- २ पनवेलने केले गजाआड...

पनवेल दि.१८(वार्ताहर): उत्तरप्रदेश राज्यातील देल्हूपुर पोलीस ठाणे हद्दीत एका इसमाचा खून करून ४ आरोपी फरार झाले होते. त्या आरोपींना गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या पथकाने खारघर येथून शिताफीने अटक करून त्यांना गुन्हयाच्या पुढिल तपासकामी देल्हूपुर पोलीसांच्या पथकाच्या ताब्यात दिले आहे.
          
 उत्तरप्रदेश राज्यातील जिल्हा प्रतापगढ मधील देल्हूपुर पोलीस ठाणे हद्दीत वकिल अहमद उर्फ पप्पु (वय ४५ वर्षे, रा. तौकलपुर, ता. राणीगंज, देल्हूपुर, जि. प्रतापगढ) यांचा आरोपींसोबत पुर्वी पासून वाद होता. त्यादरम्यान अहमद यांचा भाऊ भाउ रकिब व भाचा असफाक मोटर सायकल वरून देल्हूपुर बाजारातून घरी जात असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लाठ्याकाठ्या, लोखंडी सळई घेवून रिकीब व असफाक यांना जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्यांचे ताब्यातील ब्रिजा कार ने रकिब व असफाक यांच्या मोटर सायकलला ठोकर मारून त्यांना खाली पाडुन हातातील लाठ्याकाठ्या व लोखंडी सळईने त्यांना मारहाण केली. तसेच आरोपींनी त्यांचे हातातील अग्निशस्त्राने जखमींवर फायर करून त्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती केल्या व शिविगाळी करून जिवे ठार मारण्याची धमकी देवून तेथून पळुन गेले. सदर गुन्हयातील जखमी रकिब हा दवा उपचारा दरम्यान मयत झाला. खुना सारख्या गंभीर गुन्हयातील आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाल्याने व त्यातील चार आरोपी हे नवी मुंबई परीसरात वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वेगवगेळे पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून वर नमुद गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हयातील ४ आरोपी हे खारघर असल्याबाबत गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीलायक प्राप्त केली. तसेच गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून मिळालेल्या माहिती प्रमाणे सेक्टर ८, खारघर येथे जावून सापळा लावून सदरचे आरोपी हे पळुन जाण्याचे तयारीत असताना त्यांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले. इम्रान असीर खान(वय ३० वर्षे), मोहम्मद सलमान असीर खान(वय २९ ), गुफारान असीर खान (वय २०) मोहम्मद मुजीद इब्रार अली(वय २२) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांना पुढिल तपासकामी देल्हूपुर पोलीस ठाणे, उत्तरप्रदेश येथील पोलीस उप निरीक्षक राकेश चौरसीया व त्यांच्या पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सदरची उत्कृष्ट कारवाई नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, सपोनि प्रविण फडतरे, सपोनि संदिप गायकवाड, पोउपनि मानसिंग पाटील, पोउपनि वैभवकुमार रोंगे, पोहवा ज्ञानेश्वर वाघ, पोहवा मधुकर गडगे, पोहवा सचिन पवार, पोहवा अनिल पाटील, पोहवा प्रशांत काटकर, पोहवा रमेश शिंदे, पोहवा रणजित पाटील, चापोहवा अजित पाटील, पोहवा तांडेल, पोहवा निलेश पाटील, पोहवा  रूपेश पाटील, पोहवा इंद्रजित कानु, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा सागर रसाळ, पोहवा राहुल पवार, पोना आजिनाथ फुंदे, पोना प्रफुल्ल मोरे, पोशि संजय पाटील, पोशि प्रविण भोपी, पोशि विक्रांत माळ, पोशि अभय मे-या, पोशि नंदकुमार ढगे यांनी केली आहे.
फोटो : उत्तरप्रदेश मध्ये खून करून फरार असलेले आरोपी
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image