नितळस ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या निकिता संदीप पाटील विराजमान...
नितळस ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या निकिता संदीप पाटील विराजमान...

पनवेल / दि.०२ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील नितळस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सौ. निकिता संदीप पाटील या विराजमान होताच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत एकाच जल्लोष केला.
    नितळस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सौ. निकिता संदीप पाटील तर उपसरपंचपदी महाविकास आघाडीचे रतन भोईर हे विराजमान झाले आहे. यावेळी  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड उपजिल्हा प्रमुख रामदासदादा पाटील, महानगर प्रमुख एकनाथ  म्हात्रे, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, महानगर  संघटक बाळाराम मुंबईकर, विभाग प्रमुख प्रमोद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो : नितलस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ निकिता संदीप पाटील व उपसरपंचपदी महाविकास आघाडीचे रतन भोईर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना पदाधीकारी
Comments