भाजप संलग्न छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेना व शिवम आय केअरच्यावतीने नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..
नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

पनवेल / दि.२४(वार्ताहर): भारतीय जनता पार्टी सोबत संलग्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेना आणि शिवम आय केअरच्यावतीने मोफत आणि परिपूर्ण नेत्र तपासणी शिबिर नेरुळ येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.या वेळी डोळ्यांच्या अत्याधुनिक तपासणी सह मोतीबिंदू ऑपरेशन फक्त अकराशे रुपयात करून देण्यात आली. 

या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्या राष्ट्रीय सल्लागार ऍडव्होकेट मंगलताई घरत आणि राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांच्या माध्यमातून करण्यात आले होते, या शिबिराला माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस संजय केनेकर , कामगार मोर्चा अध्यक्ष गणेश ताठे, माजी महापौर सागर नाईक, भाजप नेते संजय उपाध्याय, भाजप नेत्या वर्षाताई भोसले , मा नगरसेवक रवींद्र इथापे, गणेश भगत, जयवंत तांडेल, सुहासिनी नायडू, छायाताई काटकर , रणजीत नाईक, वैशालीताई गीते , अंजनीताई सैनी यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
फोटो: नेत्र तपासणी शिबिर
Comments