"पनवेलकरांसाठी १६ जानेवारीला नववर्ष सुगंध संध्या" ; जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून जुन्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
जुन्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

    
पनवेल / प्रतिनिधी  -  :   पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कलारसिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे नववर्ष सुगंध संध्या या गाण्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते. कोरोनाच्या मुळे गेली काही वर्षे नियोजन करण्यात आले नव्हते. यावर्षी १६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता व्हि. के. हायस्कूल पनवेल येथे नववर्ष सुगंध संध्या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
     या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती देताना संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे की ४० वादकांच्या एकत्रित रित्या सादरीकरणासोबतच यामध्ये मुख्य गायक म्हणून प्रशांत नासेरी, मोना कामत, गोविंद मिश्रा, मिथिला माळी, समीर विजय हे असणार आहेत. या सर्व वादक आणि गायकांचे संगीत संचालन अजय मदन यांच्या जोडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन  संदीप कोकीळ हे करणार आहेत.
     हा कार्यक्रम नेहमीप्रमाणेच सर्व नागरिक आणि कला रसिकांसाठी "विनामूल्य" आयोजित करण्यात आलेला आहे. बसण्यासाठी प्रथम येणाऱ्याला प्राधान्य अशाप्रकारे बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे सांगण्यात आले. सुरुवात सोडू नका आणि शेवट चुकवू नका.अशाप्रकारचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
Comments