कळंबोली वसाहती अंतर्गत रस्त्यांची महानगरपालिकेने तातडीने दुरुस्ती करून देण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी...
 बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी...

पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः कळंबोली वसाहतीमधील अंतर्गत असलेले रस्ते अत्यंत खराब झाले असून सदर रस्त्यांची महानगरपालिकेने तातडीने दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात रामदास शेवाळे यांनी म्हटले आहे की, वसाहतीमधील भारत गॅस नाका ते राजे शिवाजीनगर रहिवाशी संघ कंपाऊंड, एल.आय.जी.-2, सेक्टर 1 त्याचप्रमाणे भवानी डेअरी ते श्रीराम मंदिर सेक्टर-1 कळंबोली या रस्त्यांची अवस्था खुप दयनिय झाली आहे. तरी तातडीने सदर रस्ते दुरुस्त करून द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
फोटो ः रामदास शेवाळे
Comments