हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळे येथे मोफत आरोग्य शिबीर...
चिपळे येथे मोफत आरोग्य शिबीर...

पनवेल वैभव / दि.२९ (संजय कदम) : हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आज चिपळे गावात मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

शिवसेना पनवेल तालुका संघटक रामदास पाटील, शिवसेना विभाग प्रमुख धनंजय पाटील, शिवसेना चिपळे शाखाप्रमुख कृष्णकांत पाटील, सुरेश म्हहत्रे  केतन पाटील, अक्षय पाटील, रवि पाटील, जयंत पाखरे यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. 
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, उपतालुका प्रमुख बबन फडके, उपविभागप्रमुख जयंत पाखरे, सुमित सुले तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : शिबिराचे उदघाटन करताना रायगड जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील
Comments