प्रवासात चोरी झालेला मोबाईल रेल्वे पोलिसांनी मिळवून दिला परत....
प्रवासात चोरी झालेला मोबाईल रेल्वे पोलिसांनी मिळवून दिला परत....

पनवेल दि.०९ (वार्ताहर) : रेल्वे प्रवासात चोरीस गेलेला मोबाईल पनवेल रेल्वे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे प्रवाशाला परत मिळवून दिला आहे.  
चेंबूर येथे राहणारा तरुण सागर कुपान हा चेंबूर ते पनवेल असा प्रवास करत होता. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १७ हजाराचा मोबाइल चोरून नेला. ता तक्रारची नोंद पनवेल रेल्वे पोलिसांकडे होताच त्यांनी तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर घटनेतील आरोपी सुदामा मोहंतो याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला व सागर कुपान यांच्याकडे सुपूर्द केला.
Comments