आरपीआयचे डॅशिंग नेते सुभाष सोनवळे यांचे दुःखद निधन....
आरपीआयचे डॅशिंग नेते सुभाष सोनवळे यांचे दुःखद निधन....
  
रसायनी (आनंद पवार) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) चे डॅशिंग नेते तथा मोहोपाडा- वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुभाष देहु सोनावळे यांचे सोमवार दि.९ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ५१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
  
अत्यंत प्रेमळ मनमिळाऊ स्वभावाचे असलेले सुभाष सोनावळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच रसायनी पंचक्रोशीत तीव्र शोककळा पसरली असून त्यांच्या आकस्मित जाण्याने रसायनी परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची, तसेच सामाजिक,धार्मिक, चळवळीची खूप मोठी हानी झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. सोनावळे हे भारत सरकारच्या अंगीकृत असलेल्या एच.ओ.सी. लिमिटेड कंपनीत कामाला होते.ते रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे सक्रिय पदाधिकारी होते.सोनावळे हे अन्यायाचा विरोधात लढणारे अत्यंत डॅशिंग व आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मित जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या दुखद निधनाचे वृत्त समजतात त्यांच्या अंत्ययात्रेत मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा काँग्रेस पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष कृष्णाशेठ पारंगे, संदीपशेठ मुंढे, उपसरपंच राकेश खारकर,माजी उपसरपंच दत्ता शिंदे, दत्ता खाने, मोहोपाडा- वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, कर्मचारी,खालापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश पाटील, सुरेश म्हात्रे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सटु आप्पा गोपाळे, वंचित बहुजन आघाडीचे आशिष जाधव, सचिन कांबळे, आरपीआयचे खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर,जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कांबळे, खोपोलीआर. पी.आय.शहराध्यक्ष तथा हातोंडचे सरपंच नितीन वाघमारे,सुशांत भवर, नरेश जाधव,शिवसेनेचे मारुती खाने,योगेश खाने,विनायक खाने, मंदार गोपाळे, माजगावचे सूर्यकांत कांबळे, सिध्दार्थ वाघमारे, आरपीआयचे रसायनी विभागीय अध्यक्ष शशी भालेराव, किरण कांबळे, पत्रकार आनंद पवार, बौद्धाचार्य भानुदास पवार,दिपक कांबळे, यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक,शैक्षणीक, धार्मिक,पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यांचा जलदान विधी शोकसभा व पुण्यानुमोदन कार्यक्रम शुक्रवार दि.२०जानेवारी रोजी सकाळी ११वा.खाने-आंबिवली येथील राहत्या घरी होणार असल्याचे कुटुंबीयांकडुन सांगण्यात आले.

सांत्वन पर भेट...
सुभाष सोनवळे यांच्या दुःखद निधनाचे वृत्त समजतात पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी महीला बालकल्याण सभापती तथा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा उमाताई मुंढे, आर.पी. आय.चे रायगड जिल्हा अध्यक्ष भाई नरेंद्र गायकवाड, आरपीआयचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक,खालापूर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती कांचनताई पारंगे, नेरळ येथील धडाडीचे पत्रकार धर्मानंद गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोनावळे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
Comments