दुकानात घुसली कार, एकाचा पाय फ्रॅक्चर, गाडीचे मोठे नुकसान...
दुकानात घुसली कार, एकाचा पाय फ्रॅक्चर, गाडीचे मोठे नुकसान...

पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) :दुकानांमध्ये स्विफ्ट कार शिरल्याने दुकानातील व्यक्ती जखमी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील अजिवली परिसरात घडली आहे.  
                    अजिवली गावाजवळ पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक स्विफ्ट कार दुकानांमध्ये शिरल्याने अपघात झाला आहे.  एक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीकडून अपघात झाल्याची माहिती असून या अपघातात दुकानातील एका व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून चालक ही किरकोळ जखमी झाला आहे. त्वरित घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 


फोटो - दुकानात घुसलेली कार
Comments