एक लाख 38 हजारांचा गुटखा जप्त ...
एक लाख 38 हजारांचा गुटखा जप्त ...


पनवेल, / दि.20 (वार्ताहर) : पनवेल तालुका पोलिसांनी एक लाख 38 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्रिमूर्ती पेट्रोल पंपाच्या बाजूला अजिवली, कोनगाव येथे एक इसम ऑटो रिक्षामध्ये गुटखा मालाचा साठा करून त्याची विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला पोलिसांनी रिक्षा स्पीड ब्रेकरवर स्लो झाली असता रिक्षाच्या समोर येऊन रिक्षा अडवली व रिक्षात बसलेल्या इसमाला ताब्यात घेतले. राहुल कल्पनाथ सिंग (वय 24 राहणार चिंचवण) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या गाडीत एक लाख 38 हजार रुपयांचा स्वादिष्ट सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी गुटखा सापडून आला. जीसन नावाच्या व्यक्तीने हा गुटखा टेम्पोमध्ये आणून दिला असल्याचे त्यांनी सांगितले व त्याचा मालक रोहन रमेश मांडे (तळेगाव वाडी) यांच्या सांगण्यावरून हे केले असल्याचे सांगितले. या तिघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Comments