पडघे गाव परिसरातून देशी दारूचा साठा हस्तगत ..
पनवेल दि. २९ ( वार्ताहर ) : तालुकयातील पडघे गाव परिसरातून तळोजा पोलिसांनी देशी दारूचा साठा हस्तगत केला आहे .
येथील गावदेवी पाडा एका घराच्या आडोशाला बेकायदेशीररित्या देशी दारूचा साठा केल्याची माहिती तळोजा पोलिसाना मिळताच त्याच्या विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणावरून ३७ देशी दारूच्या बाटल्या ज्याची किंमत जवळपास १७५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत लांब करीत आहेत .