लाखो रुपये किमतीच्या पंपाची चोरी ...
लाखो रुपये किमतीच्या पंपाची चोरी ...


पनवेल / दि. २९ ( वार्ताहर  ) : लाखो रुपये किमतीच्या पंपाची चोरी गोडाऊन मधून झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे . 
                              
शहरातील मार्केटयार्ड या ठिकाणी असलेल्या काशिनाथ कल्याणकर यांच्या गोडाऊन मधून वेगवेळ्या कंपनीचे पंप ज्याची किंमत लाखो रुपये इतकी आहे हे चोरीस गेल्यामुळे याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments