पनवेल महानगरपालिका पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेत बहुजन विकास पॅनल विजयी..
पतसंस्थेत बहुजन विकास पॅनल विजयी...

पनवेल, दि.2८ ( वार्ताहर ) : प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पनवेल महानगरपालिका पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास पॅनल चे  पंधरा पैकी चौदा  उमेदवार विजयी झाले असून पतसंस्थेवर बहुजन विकास पॅनलचे राज्य आले आहे .  
                       पनवेल महानगरपालिका पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली सन  २०२२ ते २०२७ या कालावधी करिता हि निवडणूक  खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या  निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास पॅनल ने आपले धडाडीचे १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते त्या पैकी सर्वसाधारण मतदार संघातील १० पैकी १०.महिला राखीव मतदार संघातून २ पैकी २. तसेच इतर मागासवर्ग मतदार संघातून १ पैकी १. तसेच  भटक्या विमुक्त जाती जमाती या मतदार संघातून १ उमेदवार बिनविरोध निवडून दिल्याने एकूण १४ उमेदवार भरघोस मतांनी निवडून आल्याने पतसंस्थेच्या चाव्या बहुजन विकास पॅनल कडे आल्या आहेत .या कामी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे पनवेल विभागाचे अध्यक्ष शरद कांबळे,महासचिव सतिश चींडालिया,खजिनदार भावेश चंदने,पतसंस्थाचे माजी अध्यक्ष कैलास सोलंकी,तसेच संतोष सोनवणे,संतोष गायकवाड,रुपेश चीत्रुक,पतसंस्था चे माजी अध्यक्ष मनोहर गोंधळी,सागर खरारे,कुणाल साळवे, दिपक चव्हाण,निलेश सदावर्ते,अजय टाक,गुरुनाथ भगत, दिव्या टाक,राजेश डोंगरे,मनोज चव्हाण,मनोज गायकवाड,संजय किसन जाधव,संजय शिवराम कांबळे,अरुण चिंतामण कांबळे,विकी परमार, दिपक बागडी,धर्मेंद्र पारचे,अमित पार्चे, रवि गायकवाड,मनोज कांबळे,रुचिरा साळवे,सुरेखा गायकवाड,सायली कांबळे,सुवर्णा गायकवाड, सुवर्णा चव्हाण,नरेश बहोत,सुरेश लिडलॉन,सुभाष धिंग्या,रवि बैद,संजय मोहिते,विष्णू जाधव,संतोष चितळे,योगेश मंजुळे,दिनेश बाबरे,निलेश बाबरे,धनराज पवार यांनी विशेष परिश्रम घेऊन १५ पैकी १४ जागांवर विजय संपादन करून पतसंस्थेवर बहुजन विकास पॅनल ने एकहाती सत्ता घेतली आहे.
फोटो -  बहुजन विकास पॅनल
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image