एसएमके चषक शिवसेना कामोठे शहर पुरस्कृत व अधिराज स्पोर्ट कामोठे आयोजित क्रिकेट स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद ....
 क्रिकेट स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद ....

पनवेल वैभव / दि . २६ ( संजय कदम ) : एसएमके चषक शिवसेना कामोठे शहर पुरस्कृत व अधिराज स्पोर्ट कामोठे आयोजित क्रिकेट स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे . 
                            
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहरप्रमुख कामोठे शहर राकेश गोवारी  यांच्या मार्गदर्शनाखाली एसएमके चषक शिवसेना कामोठे शहर पुरस्कृत अधिराज स्पोर्ट कामोठे आयोजित क्रिकेट स्पर्धा सचिन मनोहर त्रिमुखे (शिवसेना उप शहर प्रमुख कामोठे शहर) आणि प्रभाग क्र १३ च्या वतीने आयोजित करण्यात आले होते आणि बक्षीस वितरण समारंभ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत,  दीपक घरत  (शिवसेना महानगर समन्वयक पनवेल) आणि राकेश गोवारी  (शिवसेना शहर प्रमुख कामोठे शहर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी रामदास गोवारी (कट्टर शिवसेनिक),सचिन मनोहर त्रिमुखे(उप शहर प्रमुख कामोठे शहर) , संदीप सुतार (शिवसेना उपशहर प्रमुख कामोठे शहर),नितिन भोसले (शिवसेना विभाग प्रमुख), संजय जंगम (शिवसेना विभाग संघटक),सागर चोरगे (शिवसेना उपविभाग प्रमुख),एकनाथ गोवारी  (शाखा प्रमुख), बबन खणसे (शाखा प्रमुख सेक्टर -18), अक्षय नवसकर (शाखा प्रमुख सेक्टर -18), निलेश ठाकूर  (शाखा प्रमुख ) विकास शिर्के (शाखा प्रमुख सेक्टर -16), सुनील शेलार  (उप शाखा प्रमुख सेक्टर -18) आदी उपस्थित होते . यावेळी क्रिकेट रसिकांनी खेळाचा आनंद लुटला .
फोटो - यशस्वी संघाना बक्षीस देतांना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत व इतर पदाधिकारी
Comments