गावठी दारूसह देशी दारूचा साठा हस्तगत...
गावठी दारूसह देशी दारूचा साठा हस्तगत..


पनवेल दि.२७ (वार्ताहर) : पनवेल परिसरातून गावठी दारूसह देशी दारूचा साठा पनवेल शहर पोलिसांनी हस्तगत करत त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. 
कुडावे येथील किराणा मालाच्या दुकानात बेकायदेशीररित्या देशी दारूचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन ९८० रुपये किमतीच्या १८ बाटल्या हस्तगत केला. तर दुसऱ्या घटनेत सोमाटणे कातकरवाडी येथून एका इसमाकडून १० लिटर गावठी दारूचा साठा ज्याची किंमत १ हजार २०० रुपये इतकी आहे तो सुद्धा हस्तगत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे करंजाडे येथे किराणा मालाच्या दुकानात छापा टाकून ८३० रुपये किमतीच्या १८ बाटल्या हस्तगत केल्या आहे. अशाप्रकारे तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image