रक्तदान शिबिर संपन्न....
पोलादपूर : ( प्रतिनिधी)
पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम अशा कातळी खडकवणे अर्थात श्रीक्षेत्र दत्तवाडी येथे 6 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती सुवर्णमहोत्सवी वर्ष निमित्ताने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सदर रक्तदान शिबिराचे आयोजन सुजय प्रतिष्ठान, मैत्री रक्ताची चे अध्यक्ष सुरेशदादा सकपाळ आणि सुजय प्रतिष्ठान , मैत्री रक्ताची चे कार्यकारी सदस्य अजयदादा सकपाळ यांनी केले होते.सदर रक्तदान शिबिरात 48 जणांनी रक्तदान केले.रक्तदात्याना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या रक्तदान शिबिराला परमपूज्य गुरुवर्य दादा महाराज मोरे माऊली, महामुंबई चे संपादक मिलिंद खारपाटील , आदर्श शिक्षिका शारदा खारपाटील, अंकुश महाराज कुमठेकर, पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान कदम, निवृत्ती कदम, अनंत जाधव , मनोहर सकपाळ, जनार्धन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ मंडळ कातळी खडकवणे, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह, सुजय प्रतिष्ठान मैत्री रक्ताची चे सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.या प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश सकपाळ यांनी आतापर्यंत 89 वेळा रक्तदान करून इतरांपुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्याना आणि जमलेल्या श्रोत्यांना मार्गदर्शन केले.