पनवेल ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज....
पनवेल ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 
शिवसेनेकडून भरण्यात आले उमेदवारी अर्ज....
पनवेल / दि.०१ (वार्ताहर): पनवेल तालुक्याच्या १० ग्रामपंचायतीच्या निवडणूक  येत्या १८ डिसेंबर रोजी पार पडत असून त्या निवडणुकीसाठी आज शिवसेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)  यांच्या उमेदवारांनी निवडणूक अर्ज पंचायत समिती कार्यालय, पनवेल येथे दाखल केले.  
            तालुक्यातील नितलस मध्ये 4, करंजाडे 2, दिघाटी 1, शिरढोण 5, चिंध्रण 2, कानपोली  2, या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील व जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शन वं सहकाऱ्याने उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी तालुका प्रमुख विश्वास पेटकर, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, महाविकास आघाडीचे मा विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, मा नगरसेवक गणेश कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदाम पाटील, काँग्रेस पक्षाचे ए.  एस.  पाटील,   हेमराज म्हात्रे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रचंड उत्साहात व शक्ती प्रदर्शन करीत शिवसेना उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले
फोटो : शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल
Comments