करंजाडे शहर प्रमुख गौरव गायकवाड यांची मागणी
पनवेल/प्रतिनिधी -- करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर पाच व सहा प्रमाणे सेक्टर 1 ते 4 या भागातसुद्धा एनएमएमटी बससेवा सुरु करावी अशी मागणी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना करंजाडे शहर प्रमुख गौरव गायकवाड यांनी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम बेलापूर सीबीडी येथील अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यानुसार लवकरच सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
करंजाडे परिसर हा नव्याने विकसित होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ही वसाहत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनाही रिक्षाशिवाय वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नव्हता त्यामुळे सेक्टर पाच व सहा येथे बससेवा सुरु झाली आहे. त्याप्रमाणे वसाहतीतील सेक्टर 1 ते 4 येथून कामोठे कळंबोली असा मार्गाप्रमाणे बससेवा सुरु करावी अशी मागणी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना करंजाडे शहर प्रमुख गौरव गायकवाड यांनी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम बेलापूर सीबीडी येथील अधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाने केली आहे. त्यामुळे वसाहतीतील येथेही बससेवा सुरु झाल्यास येथील रहिवाशी्यांना फायदा होणार असल्याचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले आहे.
सेक्टर 1 ते 4 च्या भागाचा लवकरच सर्वेक्षण होणार
करंजाडे वसाहतीतील नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अंतर्गत पनवेल रेल्वे स्थानक ते करंजाडे अशी बससेवा सुरु आहे. त्यामुळे येथील प्रवाश्याना फायदा होत आहे. त्याप्रमाणे सेक्टर 1 ते 4 येथून कळंबोली, कामोठे असा नवीन मार्गांवर बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी लवकरच या भागाचा सर्वेक्षण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
रेल्वे स्टेशन ते करंजाडे बस सेवेच्या फेऱ्यात होणार वाढ
करंजाडे वसाहतीतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यानुसार पनवेल रेल्वे स्टेशन ते करंजाडे बस फेऱ्या या कमी प्रमाणात असल्यामुळे येथील प्रवाश्याना त्रास होत आहे. तरी या बस सेवा वाढवण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बससेवेच्या फेऱ्या वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आहे.
करंजाडे येथे बससेवेचा फायदा नागरिकांना होत आहे. मात्र येथील लोकसंख्या वाढली असल्याने बससेवेच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात.
- दिनेश परब - करंजाडे रहिवाशी
करंजाडेमध्ये सुरु केलेल्या बससेवेचा फायदा रहिवाशी्यांना होत आहे. मात्र या बससेवेच्या फेऱ्याच्या वेळ वाढवण्यात याव्यात.
- सुरेश चव्हाण - करंजाडे रहिवाशी
करंजाडे येथील सेक्टर पाच व सहाप्रमाणे सेक्टर एक ते चार या भागात देखील एनएमएमटी बस सेवा सुरु करावी जेणेकरून याचा फायदा येथील नागरिक व प्रवाश्याना होईल.
- सकाजी कोळेकर - रहिवाशी सेक्टर 3
करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर एक ते चार आणि पुढे कामोठे, कळंबोली अश्या मार्गांवर नवीन बससेवा सुरु करण्याय यावी.
- सुनील सिंतारे - रहिवाशी सेक्टर 3