रामेश्वर आंग्रे यांच्यासह अकरा उमेदवारांकडून मतदारांच्या भेटी-गाठी..
करंजाडे ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीत तरुणांची फौज मैदानात


पनवेल / प्रतिनिधी - राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक समजली जाते. त्यातच आता निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. विशेष अतिशय चुरशीची लढत असलेल्या करंजाडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे दिवसेंदिवस तरुणांचा कल वाढत दिसत असल्याने विजयाचा गुलाल महाविकास आघाडीचाच उडविणार असा विश्वास उमेदवारांकडून केला जात आहे.

सरपंच निवड थेट जनतेतून केली जाणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत युवकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. गावावर राजकीय वर्चस्व कोणाचे? यासाठी गावस्तरावर युवकांची चाचपणी सुरू आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींसाठी येत्या 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानुसार करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक गावाची असली तरी यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची कसोटी लागत असल्याने मोठ्या नेत्यांचेही लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी हे निवडणुकीमध्ये उभे राहिले आहे. 

रामेश्‍वर आंग्रे – थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रभाग 1 – अंजना शिवाजी कातकरी, योगेंद्र दत्ताराम कैकाडी, 
प्रभाग 2 – अक्षय मोहन गायकवाड, उमेश शंकर भोईर , कोमल रवी खिलारे, 
प्रभाग, प्रभाग 3 – श्रुती निलेश गायकवाड , नीता योगेश राणे, रुपेश बबन आंग्रे, 
प्रभाग 4 – कल्पना विनेश गायकर ,नीलम मोहन भगत, ध्रुव रामचंद्र बोरकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. 
त्यानुसार महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून सरपंच पदाचे उमेदवार रामेश्वर आंग्रे यांच्या उमेदवारांना मार्गदर्शन करीत आहेत. यावेळी तरुणांची फौज मैदानात उतरली आहे. त्यानुसार प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून आता घरोघरी जाऊन मतदाराच्या भेटी-गाठी घेण्याचे सुरु असून मतदारांकडून महाविकास आघाडीच्या विजयाचा गुलाल उधळणार असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image