महिलेस धक्का मारून सोनसाखळी हिसकावून दुकली पसार ....
महिलेस धक्का मारून सोनसाखळी हिसकावून दुकली पसार ...


पनवेल दि.२७ (वार्ताहर) : पायी जात असलेल्या एका महिलेस मोटारसायकल वरून आलेल्या दोघांपैकी एका इसमाने त्यांना धक्का मारून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पसार झाल्याची घटना कळंबोली वसाहतीमध्ये घडली आहे. 
कळंबोली येथील करावली चौकात हेलन नाडार या पायी जात असताना दुचाकीस्वाराने त्यांना धक्का मारला त्यानंतर दुचाकीवरील एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची सोनसाखळी हिसकावून ते पसार झाले.
Comments