मा.नगरसेवक रमेश गुडेकरांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश...
मा.नगरसेवक रमेश गुडेकरांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
पनवेल :-   शिंदे गटाचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या शिष्टाईने अखेर गुडेकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांना जाहीर समर्थन दिले आहे. अर्बन बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत उमेदवारी निश्चित करण्यावरून रमेश गुडेकर व शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे वाद झाल्याचे समजते. 

याबाबत एक जाहीर पत्रक काढून गुडेकर यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा सल्लागार पदावर असूनही जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी त्यांची हकालपट्टी केली. या परिस्थितीचा फायदा घेत महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी लागलीच रमेश गुडेकर यांची भेट घेऊन एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत दिल जमाई केली.  अनेकदा वादग्रस्त विधाने किंवा आपल्या शिवराळ भाषेमुळे गुडेकर चर्चेत असले तरी बाळासाहेब ठाकरेंपासून काम केलेले रायगड जिल्ह्यातील सर्वात जुने शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे. 1971 पासून तब्बल पाच वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. शाखाप्रमुख- शहर प्रमुख पासून ते थेट वरिष्ठ जिल्हा सल्लागारापर्यंत शिवसेनेत त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या. खरे तर या आधीच 'मी बाळासाहेबांचा, मासाहेबांचा पण नाही मातोश्रीचा' असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात असल्याचे काही महिन्यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केले होते परंतु काल अधिकृतरित्या प्रथमेश सोमण यांच्या मध्यस्थीने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत थेट प्रवेश करत शिंदे यांना जाहीर समर्थन दिले. रायगड किंवा पनवेल शिवसेनेमधील एक जुने नाव असल्याने गुडेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे. 

यावेळी वर्षा निवासस्थानी प्रथमेश सोमण यांच्यासोबत पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनवणे संघटक अभिजीत साखरे उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते यापुढेही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार म्हणूनच काम करण्याचे आदेश शिंदे यांनी दिल्या बाबत गुडेकर यांनी सांगितले. यावेळी पनवेलच्या विविध प्रश्नांसाठी पनवेल मध्ये येण्याचे निमंत्रण प्रथमेश सोमण यांनी महानगर प्रमुख म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image