शिवसेना संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या वतीने विद्यार्थांना मास्कचे वाटप ...
 विद्यार्थांना मास्कचे वाटप ...

पनवेल / दि.३१ (संजय कदम) : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख तथा दि ईलाईट पब्लिक स्कूलचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या वतीने दि ईलाईट पब्लिक स्कूलमधील विद्यार्थांना मास्कचे वाटप करण्यात आले. 
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना उपाययोजनाअंतर्गत आज तळोजा येथील ईलाईट पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. शाळेचे चेअरमन व रायगड शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोना विषयक जनजागृती करत मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच शाळॆत व सार्वजनिक ठिकाणी वावरताना या मास्कचा वापर करण्याच्या सूचना बबनदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. यावेळी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  फोटो : दि ईलाईट पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना मास्कचे वाटप करताना शिवसेना संपर्कप्रमुख बबनदादा पाटील
Comments