कर्मवीरांच्या कार्यामुळेच ग्रामीण शिक्षणात प्रगती ; डॉ. अनिल काकोडकर ...
कर्मवीरांच्या कार्यामुळेच ग्रामीण शिक्षणात प्रगती ; डॉ. अनिल काकोडकर 

पनवेल / प्रतिनिधी : - कर्मवीरांच्या कार्यामुळेच ग्रामीण शिक्षणात प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमीत्त रायगड विभागाच्या वतीने 'कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहा अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या कृतज्ञता सप्ताहाचा सांगता समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी आयोजीत करण्यात आला होता. हा सोहळा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी ८२ वा जन्मदिवस साजरा करण्यात आला. दुग्ध शर्करा योग म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्त झाल्याचे पन्नास वर्षे पूर्ण झाली. रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फोफावण्यामध्ये त्यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या पाचही विभागांच्या वतीने जन्म दिनाच्या औधित्याने कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत संस्थेच्या रायगड विभागातील पोलादपूर, उरण, पनवेल फुंडे, मुंबई, मोखाडा या सहा गटात विविध स्पर्धा झाल्या वक्तृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला, पोस्टर्स, गायन, नृत्य, कबड्डी, खो खो, कुरसी, अॅथलेटिक्स, हाफ मॅरेथॉन अशा विविध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. या मध्ये एकूण ५५९० विद्यार्थी सहभागी झाले होते. या कृतज्ञता सप्ताहाचा सांगता समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुकवारी भारत सरकारच्या अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या समारंभात कृतज्ञता सप्ताहात दरम्यान आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी डॉक्टर अनिल काकोडकर यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागामध्ये शाळा उघडल्यामुळे ग्रामीण शिक्षणात प्रचंड प्रगती झाली. आज ग्रामीण शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये कर्मवीरांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यांचे कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक आणि अखंड प्रेरणा देणारे आहे, असे मत व्यक्त केले. तसेच देशाकडे भरपूर पैसा असला म्हणजे देश पुढारलेला होत नाही तर देश पुढे जाण्यासाठी देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित झाले पाहिजे. त्यासाठी देशातील युवकांनी नाविन्यपूर्ण संशोधनाकडे लक्ष दिले पाहिजे असल्यचे सांगीतले.

तसेच मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी   संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याचा गौरव केला. तसेच या कृतज्ञाता सप्ताहा अंतर्गत आयोजीत कलेल्या विविध
स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आणि शरद पवार यांनी जिवनामध्ये जे काय मिळवले आहे त्याकडे बघून विद्याथ्यांनी वाटचाल करावी असा सल्ला दिला.

या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी जे पाटील, संस्थेचे सचिव डॉक्टर विठ्ठल शिवणकर, रायगड विभाग चेअरमन आमदार बाळाराम पाटील, संस्थेचे  जनरल बॅडी सदस्य जे. एम. म्हात्रे, वाय. टी. देशमुख, पनवेल कॉलेज प्राचार्य व कृतज्ञता सप्ताह समितीचे अध्यक्ष डॉक्टर गणेश ठाकूर, प्राचार्या केबीपी कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर शुभदा नायक, महेंद्र घरत, दशरथ भगत, डॉक्टर आबासाहेब सरवदे, माया कळविकट्टी यांच्यासह रायगड विभागातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments