माझे संपूर्ण पॅनल या निवडणुकीत मतदार निवडून आणतील - ऍड. मनोज भुजबळ

९५ टक्के मतदान होण्याची शक्यता...
पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणी निवडणुक...

पनवेल / दि.२१ (संजय कदम) : पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक आज होत असून यामध्ये ९५ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. ९९७ मतदार संख्या असलेल्या या निवडणुकीसाठी नवीन कोर्ट इमारत येथे या मतदानासाठी मतदान केंद्र उभारण्यात आले. या निवडणुकीत माजी अध्यक्ष ऍड. मनोज भुजबळ पुन्हा अध्यक्षपदासाठी रिंगणात उभे असल्याने हि निवडणूक चुरशीची होणार आहे.

ऍड. मनोज भुजबळ यांच्या पॅनेलने या निवडणुकीत ११ उमेदवार उभे केले असून यापैकी ऍड.सुशांत घरत हे बिनविरोध निवडून आले आहे. तर यंदा सचिव पदासाठी ऍड. प्रल्हाद खोपकर हे चौथ्यांदा उभे राहिले आहेत तर उपाध्यक्षपदासाठी ऍड. संदीप जगे, सहसचिव पदासाठी ऍड. सिमा भोईर, खजिनदार पदासाठी ऍड. धनराज तोकडे, ऑडिटर पदासाठी ऍड. विशाल डोंगरे तर सदस्य पदासाठी ऍड. प्रगती माळी, दीपाली बोहरा, अमित पाटील. भूषण म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मागील सहा वर्षात केलेली कामांवर माझा विश्वास असून माझे संपूर्ण पॅनल या निवडणुकीत मतदार निवडून आणतील असा विश्वास मनोज भुजबळ यांनी व्यक्त केला. फोटो : पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणी निवडणुकीसाठी ९५ टक्के मतदान होण्याची शक्यता
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image