महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद...
मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल दि. ११ (संजय कदम) : महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल जवळील देवद येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात आज भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोग्य शिबिराला आमदार बाळाराम पाटील यांनीही भेट दिली.  
पनवेल येथील अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारीवर्ग यांनी या आरोग्य शिबिरामध्ये आलेल्या प्रत्येक रूग्णांची काळजीपूर्वक तपासणी करून आरोग्याच्या प्रत्येक समस्याचे निराकरण केले. देवद गाव परिसरातील अनेक लोकांनी या शिबिरामध्ये मोफत तपासणीचा लाभ घेतला. देवद ग्रामपंचायत सदस्या ललिता गणेश गायकर आणि दिपाली संजय पाटील यांच्यामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी शिवसेना पनवेल तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर, उपमहानगरप्रमुख लीलाधर भोईर, उपमहानगरप्रमुख किरण तावदरे, राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल तालुका कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, माजी पंचायत समिती सदस्य राजेश केणी, देवद ग्रामपंचायत माजी सरपंच करूणा वाघमारे, सदस्य संतोष वाघमारे, शिवसेना उप विभाग प्रमुख जयंत पाखरे, शिवसेना विभाग प्रमुख विशाल भोईर, हेमंत  म्हात्रे, संजय पाटील, गणेश गायकर, सुदाम वाघमारे, वासुदेव वाघमारे, जगदीश  वाघमारे, सचिन वाघमारे, राम वाघमारे, आकाश वाघमारे, हरिश्चंद्र वाघमारे, बाबुराव वाघमारे, गुरूनाथ वाघमारे, पांडुरंग वाघमारे, अनंत वाघमारे, संतोष वाघमारे, राहुल पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 


फोटो : श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात भव्य मोफत आरोग्य शिबिर..
Comments
Popular posts
जम्मू काश्मीर आणि मोझांबिक मेगा सर्जिकल कॅम्पवीरांचा सन्मान...
Image
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत १ कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन हस्तगत ; दोन आरोपी ताब्यात..
Image
पनवेल तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण..
Image
तळोजा भागातुन ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण ; पोलिसांकडुन अपहरणकर्त्याचा शोध सुरु..
Image
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा करणार - सर्व पक्षीय कृती समितिचा निर्धार
Image