रस्त्यावर बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई...
रस्त्यावर बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यावर कारवाई..


पनवेल दि.४ (वार्ताहर) : बेकायदा फुटपाथवर टेबल ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करून गॅस सिलेंडरच्या साहाय्याने शेगडी पेटवून वडापाव व चहा ची विक्री करणाऱ्याविरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
शहरातील एस.टी.स्टॅन्ड समोरील फुटपाथवर कांता आंग्रे व किशनलाल बारोट या इसमांनी  टेबल ठेवून टेबलवर मानवी जीवितास धोकादायक ठरेल अश्या रीतीने रहदारीस अडथळा निर्माण करून गॅस सिलेंडरच्या साहाय्याने शेगडी पेटवून वडापाव व चहा ची विक्री करत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रमोद पवार व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणावरून सिलेंडर, लोखंडी शेगडी व इतर ऐवज हस्तगत केला आहे.
Comments