करंजाडेत महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन..

सरपंचपदाचे उमेदवार रामेश्वर आंग्रे यांच्यासह सदस्यपदासाठी ११ उमेदवारांनी भरले अर्ज

करंजाडे/प्रतिनिधी -- पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने करंजाडे ग्रामपंचायतीचे महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रामेश्वर आंग्रे यांच्यासह सदस्यपदासाठी 11 उमेदवारांनी गुरुवारी ता.1 रोजी पनवेल पंचायत समिती कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज भरला. यावेळी महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, रामदास पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्तित होते.

पनवेल तालुक्यात 18 डिसेंबर 2022 रोजी 10 ग्रामपंचायतच्या निवडणूका होणार असून या ग्रामपंचायतच्या निवडणूका मध्ये निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष असे चार पक्ष एकत्र आले आहेत. या चारही पक्षांनी एकत्र येत पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या चारही पक्षाने महाविकास आघाडी स्थापन करून त्या द्वारे निवडणूक लढविली जात आहे. प्रत्येक गावागावात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस (आय), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असून या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या बळावर व त्यांच्या जनसंपर्कच्या बळावर निवडणूकामध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना आहे. त्यानुसार करंजाडे ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रामेश्वर आंग्रे यांच्यासह सदस्यपदासाठी 11 उमेदवारांनी गुरुवारी शक्ती प्रदर्शन करीत पनवेल पंचायत समिती कार्यालयात अर्ज भरण्यात आले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image