थंडीचा हंगामात खाडी किनाऱ्यांवर विविध पक्ष्यांचे झाले आगमन...
थंडीचा हंगामात खाडी  किनाऱ्यांवर विविध पक्ष्यांचे झाले आगमन...

पनवेल दि. ०७ ( वार्ताहर ) : थंडीचा हंगाम सुरू होताच खारघरमधील खाडी किनाऱ्यांवर विविध पक्ष्यांचे आगमन होते. यंदा थंडी अद्याप सुरू झाली नसली तरी पक्षी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 
                             किनाऱ्यावरील उबदार वातावरणासोबत मुबलक अन्नामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खाडी किनाऱ्यांवरील पक्षीप्रेमींची वर्दळ वाढली आहे. निसर्गरम्य परिसर असलेल्या खारघरच्या खाडीच्या जलाशयात उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर आशिया, नेपाळ, तिबेट, लडाख आदी देश-विदेशीपक्ष्यांची रेलचेल असते. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी या थंडीच्या महिन्यात खारघर येथील सेक्टर १७ मधील संजीवनी विद्यालयाच्या समोरील कांदळवने, सेक्टर पंचवीस ते सत्तावीस खारजमीन, पाणथळ परिसरात आणि खाडीकिनाऱ्यावर देशविदेशातील स्थलांतरित पक्षी खाद्याच्या शोधात येत आहेत. याशिवाय खारघरमधील डोंगरावरदेखील या पक्ष्यांचा वावर आहे. यात सध्या गोल्डन प्लोव्हर, कॉमन सँडपिपर, सॅण्ड प्लोव्हर, वुडसँडपिपर, कॉमन कुकू, वेडा राघू, सोन चिखल्या, रेड बुलबुल, कॉमन किंगफिशर, पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर, दाबील, सरग्या, शेकाट्या असे विविध पक्षी प्रामुख्याने दिसून येत आहे. खारघरमधील डोंगराची रांग, माळरान, खार जमिनी, पाणथळ जागा आणि कांदळवन आदी परिसर पक्षीप्रेमींसाठी सध्या पर्वणी ठरत आहे. त्यात खारघरमधील ज्योती नाडकर्णी, नरेश चंद्रसिंग आणि तरंग सरीन यांनी देखील पक्ष्यांचा हा किलबिलाट कॅमेराबद्ध आहे. गेली तीन वर्षे ही मोहीम सुरू असून पन्नासहून अधिक केली प्रजाती आश्रयाला येत असल्याचे दिसून आले.
फोटो - खाडी  किनाऱ्यांवर विविध पक्ष्यांचे झाले आगमन
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image